दाक्षिणात्त्य अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या विवाहाची घोषणा केली आहे.
पेशाने व्यावसयिक असणाऱ्या गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार आहे.
‘इंटेरिअर डिझायनर’ असणाऱ्या गौतमची फर्निचर, होम डेकोर आणि हाऊसहोल्ड सामानाची कंपनी आहे.
व्यासायिक असणाऱ्या गौतमला देश-विदेश फिरण्याची आवड देखील आहे.
काजल आणि गौतम हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या नात्याबद्दल मौन बाळगले होते.
विवाहाच्या घोषणेनंतर त्यांनी स्वतःचे एकत्र फोटो शेअर केले आहे.
30 ऑक्टोबर रोजी काजल-गौतम विवाहबंधनात अडकणार आहेत.