बुमराहसारखी एक्शन असलेल्या 22 वर्षाच्या घातक गोलंदाजाने वनडे क्रिकेटमधून घेतला ‘ब्रेक’
नवीन उल हकची तुलना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बरोबर होते.
Follow us
बायो बबलचा थकवा, मानसिक तणाव यामुळे अनेक क्रिकेटपटुंनी ब्रेक घेतल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण अफगाणिस्तानच्या अवघ्या 22 वर्षाच्या वेगवान गोलंदाजाने टी-20 वर्ल्डकप 2022 च्या तयारीसाठी वनडे क्रिकेटमधुन ब्रेक घेतला आहे. नवीन उल हक असे या गोलंदाजाचे नाव असून तो अफगाणिस्तानच्या संघाचा मुख्य भाग आहे. त्याने टी-20 वर्ल्डकपपर्यंत वनडे क्रिकेट खेळणार नाही अशी घोषणा केली आहे.
मी टी-20 क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार आहे. यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अफगाणिस्तान बांगलादेशविरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार आहे. नवीन उल हक भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजमध्येही खेळणार नाही.
नवीन उल हक वेगवेगळ्या परदेशी टी-20 लीगमध्येही खेळतो. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तो सिलहट थंडर संघाकडून खेळतो. लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्टार्स आणि कँडी टस्कर्सकडून नवीन उल हक खेळला आहे. इंग्लंडमध्ये लीस्टशायर संघासाठी टी-20 क्रिकेट खेळला आहे.
नवीन उल हक वेगवान गोलंदाज असून त्याने 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तानकडून टी-20 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 13 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.
नवीन उल हकची तुलना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बरोबर होते. त्याची बॉलिंग एक्शन बुमराहशी मिळती जुळती आहे. नवीन उल हकचाही चेंडू पडल्यानंतर लगेच आत येतो. त्याच्याकडे चांगले स्लोअर बॉल्सही आहेत. ज्यामुळे तो टी-20 मध्ये अधिक धोकादायक आहे.