फोटोमधून पाहा काय झाली पाकिस्तानतची परिस्थिती, रात्रभर सुरु होता गोळीबार
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरु झाला आहे. आंदोलकांनी अनेक वाहने आणि घरे जाळली आहे. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
1 / 6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल दुपारी अटक करण्यात आली. इस्लामाबाद हायकोर्टातून त्यांना अटक करण्यात आली होती. एखाद्या दहशतवाद्याला पकडावं तसं इम्रान खान यांची मानगुटी पकडून त्यांना अक्षरश: ओढत ओढतच इम्रान यांना व्हॅनमध्ये टाकलं.
2 / 6
अटकेनंतरचा इम्रान खान यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत इम्रान खान अत्यंत निराश दिसत आहेत. एका खुर्चीवर बसून इम्रान खान शून्यात पाहात आहेत. हताशपणे बसलेल्या इम्रान यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत आहे.
3 / 6
इम्रान खानच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. आंदोलकांनी दगडफेक केली, जाळपोळ केली आणि लष्कराच्या मुख्यालयापासून कॉर्प्स कमांडरच्या घरापर्यंत सर्व काही लुटले.
4 / 6
जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला आणि गोळीबारही केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
5 / 6
सध्या पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद असून फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबची सेवा बंद करण्यात आली असून कलम 144 लागू करण्यात आली आहे.
6 / 6
imran khइम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या खाजगी निवासस्थानाला आग लावली. शहबाज शरीफ गेल्या वर्षी अविश्वास ठरावाद्वारे इम्रान यांची सत्तेतून हकालपट्टी करून पंतप्रधान झाले होते.an