प्रेक्षकांचा लाडका ‘बबड्या’ मालिकेत परततोय; साकारणार ‘ही’ भूमिका

सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ही मालिका 18 मार्चपासून सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल.

| Updated on: Feb 22, 2024 | 9:56 AM
येत्या 18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. मालिकेच्या प्रोमोंना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

1 / 5
या मालिकेतल्या आणखी एका सदस्याची ओळख नव्या प्रोमोतून होणार आहे. हा नवा सदस्य म्हणजे सौमित्र रणदिवे. सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष पत्की सौमित्रची भूमिका साकारणार असून तो जवळपास आठ वर्षांनी स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करणार आहे.

2 / 5
सौमित्र ही भूमिका साकारण्यासाठी आशुतोष फारच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, "स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेत मी एक छोटी भूमिका साकारली होती. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे."

3 / 5
"सौमित्र रणदिवे हा वकील आहे. अतिशय हुशार, महत्वाकांक्षी आणि व्यावहारिक. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आणि नात्यांचं महत्त्व जाणणारा. मी याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळं असं हे पात्र आहे. मालिकेची टीम उत्तम आहे त्यामुळे काम करताना धमाल येतेय," अशी भावना आशुतोषने व्यक्त केली.

4 / 5
घरोघरी मातीच्या चुली या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.