Photo Gallery : आता उठवू सारे रान, हंडाभर पाण्यासाठी नगरच्या रणरागिणींचा एल्गार…!

| Updated on: Mar 24, 2022 | 4:42 PM

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

1 / 7
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

2 / 7
आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

3 / 7
ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

4 / 7
४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

5 / 7
महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

6 / 7
सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

7 / 7
अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.