अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने दुलीप ट्रॉफीची फायनल जिंकली. वेस्ट झोनची टीम चॅम्पियन बनली आहे. कोइम्बतूर येथे फायनल मॅच झाली. वेस्टने साऊथ झोनला तब्बल 294 धावांनी हरवून किताब जिंकला.
फायनलमध्ये वेस्ट झोनने साऊथ झोनसमोर विजयासाठी 529 धावांच मोठं लक्ष्य ठेवलं होतं. साऊथ झोनचा डाव 234 धावात आटोपला.
वेस्ट झोनसाठी फायनलच्या दुसऱ्याडावात शम्स मुलानीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दोन्ही डावात मिळून जयदेव उनाडकट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.
यशस्वी जैस्वाल वेस्ट झोनच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने दुसऱ्याडावात तब्बल 265 धावांची खेळी केली. मॅचमध्ये एकूण 266 धावा फटकावल्याबद्दल त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.
दुलीप ट्रॉफीमध्ये प्लेयर ऑफ द सीरीजचा अवॉर्ड जयदेव उनाडकटला मिळाला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 13 विकेट घेताना एकूण 50 रन्स केल्या.