अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
2025 हे वर्ष अक्षय कुमारसाठी धमाकेदार ठरणार आहे, कारण त्याचे सात चित्रपट 'बॅक टू बॅक' प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये चार सिक्वेल, दोन नवीन चित्रपट आणि एक हॉरर-कॉमेडीचा समावेश आहे.
Akshay Kumar will release seven films back to back in 2025
Follow us
2025 हे वर्ष अक्षय कुमारसाठी धमाकेदार ठरणार आहे. अक्षयचे तब्बल सात चित्रपट बॅक टू बॅक पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमार 2025 मध्ये धुमाकूळ घालणार असं दिसतंय. अक्षय कुमारचे 2025 मध्ये 4 सिक्वेल, 2 ओरिजिनल आणि एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या काही सेकंदाच्या क्लिपमधून छोटीशी झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. कलाकारांची फौजच या क्लिपमध्ये पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच हा चित्रपट येण्याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. 2025 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जाते.
अक्षय कुमारचा ‘Sky Force’ हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. अक्षय कुमारचा 2025 मधील हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
त्यानंतर अक्षयचा ‘शंकरा’ चित्रपट येणार असून अक्षयसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. हा एक बायोपिक असल्याचं बोललं जात आहे.
अक्षय कुमारची आणखी एक हिट फ्रँचायझी ‘हाऊसफुल 5’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. याआधी हाऊसफुल चित्रपटाचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस आलेत. या चारही चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे आता पाचवा भाग कसा असणार आहे यासाठी प्रेक्षक नक्कीच आतूर आहेत
अक्षयच्या आणखी एका चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे तो म्हणजे ‘जॉली एलएलबी 3’. चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार एकत्र दिसणार आहेत. ‘जॉली एलएलबी’च्या पहिल्या भागात अभिनेता अर्शद वारसीने काम केलं होतं. तर दुसऱ्या भागात अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. हे दोन्ही सिनेमे खूप गाजले आणि आता ‘जॉली एलएलबी 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
अक्षय कुमारचा एक हॉरर चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘भूत बंगला’ असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या जोडीची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हॉरर आणि कॉमेडीने भरलेला हा चित्रपट असणार आहे.
प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. या चित्रपटाच्या दोन्ही भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे पुढील वर्षी हे तिघेही ‘हेरी फेरी 3’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. फरहाद सामजी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. प्रेक्षकांनाही या चित्रपटाचा तिसरा भाग पाहायला नक्कीच आवडणार आहे.