बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या जबरदस्त अभिनयामुळे ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटात अक्षय काहीतरी वेगळे करतो. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षयचे चाहते त्याचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, हा चित्रपट वादात अडकला आहे.
अक्षयचा हा चित्रपट राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. करणी सेनेला या चित्रपटाच्या नावावर आक्षेप आहे. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष, सुरजितसिंग राठौर म्हणाले आहेत की, हा चित्रपट महान राजा पृथ्वीराज चौहानवर आधारित आहे, तेव्हा चित्रपटाचे नाव 'पृथ्वीराज' कसे ठेवू शकतात?
करणी सेनेचे म्हणणे आहे की, या चित्रपटाचे नाव फक्त पृथ्वीराज न ठेवता चित्रपटाला त्याचे पूर्ण नाव द्यावे. इतकेच नाही तर करणी सेनेने चित्रपटाविषयी अधिक माहिती मागितली आहे. रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट स्क्रीनिंग केला पाहिजे.
करणी सेनेने सरळ-सरळ धमकी दिली आहे की, जर या मागण्या मान्य केल्या नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल. यापूर्वी 'पद्मावत' चित्रपटाच्या वेळी संजय लीला भन्साळीचे काय झाले तसेच या चित्रपट्यांच्या निर्मात्यांनादेखील होईल.
आम्ही चित्रपट निर्मात्यांच्या उत्तराची वाट पाहात आहोत, असे करणी सेनेने म्हटंले आहे. अक्षय कुमारने 2019 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती.
ट्विट करत अक्षयने आपल्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली होती. पृथ्वीराज चित्रपटाचे दिग्दर्शिक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करीत आहेत.