
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असते. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस अत्यंत जवळच्या व्यक्तींसोबत लंडन येथे साजरा केला. आगामी चित्रपटात आलिया व्यस्त आहे.

नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार आलिया भट्ट ही विमानतळावर पुरस्कार सोहळ्यात पोहचण्यासाठी विदेशात निघाली होती. मात्र, आजोबांची तब्येत बिघडल्याने आलिया विमानतळावरून परत आलीये.

सोनी राजदान यांचे वडील नरेंद्र राजदान आणि आलिया हिचे आजोबा यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याने आलिया परत आलीये. दवाखान्यात नरेंद्र राजदान यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अवॉर्ड शोला पोहचण्यासाठी आलिया विदेशात निघाली होती, मात्र आजोबांच्या तब्येतीची माहिती मिळताच ती परत आलीये. मुंबईतील एका दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आलिया भट्ट हिच्या आजोबांचे वय हे 95 वर्ष आहे. डाॅक्टर सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.