बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, आलियाने एका चिमुकलीला जन्म दिलाय. हाॅस्पिटलमधून घरी जातानाचे काही फोटो आलियाचे व्हायरल झाले आहेत.
आलिया आणि रणबीर कपूरचे चाहते यांच्या मुलीची एक झलक पाहण्यास उत्सुक आहेत. सोशल मीडियावर चाहते बारीक लक्ष ठेऊन आहेत.
आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. यामुळे कपूर आणि भट्ट कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आलिया हाॅस्पिटलमधून घरी आलीये.
हाॅस्पिटलमधून घरी जातानाचे आलिया भट्टचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत. गाडीमध्ये आलिया बसलेली दिसत आहे.
आपल्या लाडक्या सुनेला घरी घेऊन जाण्यासाठी नितू कपूरही आल्याचे दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये आलियाच्या मांडीवर तिची मुलगी दिसत आहे.