PHOTO : बंगालमध्ये अमित शाहांची भव्य रॅली, ममतांचा बंगाल गड खालसा होणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. (Amit Shah roadshow in West Bengal).
तृणमूल काँग्रेसचे 10 आमदार आणि काँग्रेसचा, सीपीआयचा (एम) प्रत्येकी एक आमदार भाजपात गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 1998 तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तृणमूल काँग्रेसची गेल्या 23 वर्षात जितकी हानी झाली नव्हती तितकी हानी यावर्षी भाजपने केली आहे. विशेष म्हणजे भाजपाच पक्षप्रवेश केलेल्या एकाही नेत्याने विधानसभेचं सदस्यत्व सोडलेलं नाही.
Follow us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी रविवारी (20 डिसेंबर) दिवंगत ज्येष्ठ लेखक रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन येथे जावून श्रद्धांजली अर्पण केली. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भव्य रॅली काढली. या रॅलीत तुफान गर्दी होती. बंगालच्या नागरिकांना परिवर्तन हवं आहे, असं अमित शाह यावेळी रॅलीत म्हणाले.
अमित शाह यांनी बंगाल दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर निशाणा साधला होता. अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी (19 डिसेंबर) बंगालमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.
अमित शाह बंगाल दौऱ्यादरम्यान रविवारी बीरभूर येथे पोहोचले. तिथे भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
अमित शाह बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतन येथे विश्व भारती विश्वविद्यालय गेले. तिथे त्यांनी ज्येष्ठ लेखक रविंद्रनाथ टागोर यांना श्रद्धांजली वाहिली. “गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या महान व्यक्तींना प्रेरणा दिली. टागोरांचे विचार सर्व बंधनांना मोडून पुढे जाण्यास शिकवतात”, असं अमित शाह यावेळी म्हणाले.
रविंद्रनाथ टागोर यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अमित शाह शांतीनिकेतनच्या विश्व भारती विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर ते बांग्लादेश भवनात सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले.
अमित शाह यांनी बीरभूम येथे एका गायकाच्या कुटुंबासोबत जेवण केलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते मुकुल रॉय, दिलीप यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते.
तृणमूल काँग्रेसचे 10 आमदार आणि काँग्रेसचा, सीपीआयचा (एम) प्रत्येकी एक आमदार भाजपात गेले आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 1998 तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तृणमूल काँग्रेसची गेल्या 23 वर्षात जितकी हानी झाली नव्हती तितकी हानी यावर्षी भाजपने केली आहे. विशेष म्हणजे भाजपाच पक्षप्रवेश केलेल्या एकाही नेत्याने विधानसभेचं सदस्यत्व सोडलेलं नाही.
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी स्टेडिअम रोडवर हनुमान मंदिर ते बोलपूर सर्किट या दरम्यान मोठी रॅली काढली. यावेळी रॅलीत प्रचंड गर्दी बघायला मिळाली.