बिग बी अर्थात अमिताभ बच्चन नुकताच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहचले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन देखील होता.
आज अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झालाय. त्यापूर्वीच सकाळी अमिताभ बच्चन हे सिद्धिविनायक मंदिरात पोहचले.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी बाप्पासमोर डोकं टेकवत आर्शिवाद घेतले. यावेळी दर्शन घेतल्यानंतर अमिताभ बच्चन बाप्पाला हात जोडताना दिसले.
ऐश्वर्या बच्चन देखील तिच्या वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे मंदिरातील फोटो व्हायरल होत आहेत.
अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता हे ऊंचाई या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.