सैफला घटस्फोट का दिला? अमृताने सोडलं मौन; म्हणाली “इतकं सर्व झालं..”

सैफ अली खान आणि अमृता सिंहने घटस्फोट का घेतला, यामागचं कारण कधी समोर आलं नाही. दोघंही त्यावर मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. मात्र घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर अमृताने एका मुलाखतीत त्याचा उल्लेख केला होता.

| Updated on: Jun 04, 2024 | 1:14 PM
अभिनेता सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री अमृता सिंहनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. 1991 मध्ये सैफ आणि अमृताने लग्न केलं. या दोघांच्या वयात बरंच अंतर आहे. त्यामुळे या जोडीने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. लग्नाच्या 12 वर्षांनंतर सैफ आणि अमृताने एकमेकांना घटस्फोट दिला.

1 / 5
या दोघांच्या घटस्फोटामागे विविध कारणांच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र त्यावर सैफ किंवा अमृताने कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर अमृताने एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. सैफपासून विभक्त होण्याच्या प्रश्नावर अमृताने सांगितलं होतं की हे तिचं वैयक्तिक प्रकरण आहे. त्याबद्दल कोणालाच काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.

2 / 5
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली होती, "इतकं काही झालं होतं. मीडियामध्ये आधीच खूप काही म्हटलं गेलं होतं. त्यावर मी काय बोलणार? त्या माझ्या खासगी भावना होत्या. मला कोणासोबतच त्या शेअर करायच्या नव्हत्या. त्यावेळी माझं प्राधान्य माझी मुलंबाळं होती. मला स्वत:लाही सावरायचं होतं."

3 / 5
"मला त्या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. कारण माझ्या मुलांच्या मनात त्यांच्या पालकांविषयी कोणती नकारात्मक भावना असू नये, असं मला वाटत होतं. मी घरी राहून परिस्थितीवर रडत बसू शकले असते. पण माझ्या मुलांनी परिस्थितीसमोर हार पत्करावी, हे मला मान्य नव्हतं", असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
सैफ आणि अमृताच्या घटस्फोटाबाबत शर्मिला टागोर 'कॉफी विथ करण'मध्ये व्यक्त झाल्या होत्या. "ती वेळ आमच्यासाठी अजिबात चांगली नव्हती. कारण त्यावेळी इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आम्हाला लहान मुलांची खूप आवड होती. अमृता आणि तिच्यासोबत दोन्ही मुलांची साथ गमावणं, आमच्यासाठी दुपटीने त्रासदायक होतं,” असं त्या म्हणाल्या होत्या.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.