Marathi News Photo gallery Animal fame actress Tripti Dimri aka national crush is tea lover know about her fitness daily routine diet workout plan
‘ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरीचा डाएट रुटीन; रोज 5-6 कप चहा पिऊन..
'ॲनिमल' या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीने विशेष छाप सोडली. या चित्रपटातील ॲक्शन सीन्ससोबतच रणबीर कपूरसोबत तृप्तीच्या इंटिमेट सीन्सचीही तितकीच चर्चा होत आहे. तृप्ती आता सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
1 / 8
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये भूमिका साकारलेल्या 28 वर्षीय तृप्ती डिमरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर तिची एक वेगळीच क्रेझ पहायला मिळत असून नेटकऱ्यांनी तिला 'नॅशनल क्रश' असं नाव दिलं आहे.
2 / 8
‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली आहे. तृप्तीच्या सौंदर्यावर नेटकरी घायाळ झाले आहेत. सौंदर्यासोबतच ती तिच्या फिटनेसमुळेही ओळखली जाऊ लागली आहे. तृप्तीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा 'डेली रुटीन' सांगितला.
3 / 8
या मुलाखतीत तिने सांगितलं, "सकाळी मी 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास उठते आणि त्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी पिते. पाणी प्यायलानंतर मला रोज सकाळी गरमागरम चहा हवा असतो. कारण मी चहाप्रेमी आहे आणि चहा प्यायल्याशिवाय मला तरतरी येत नाही."
4 / 8
एकेकाळी मी दिवसातून पाच ते सहा कप चहा प्यायचे. पण नंतर हळूहळू मी चहा पिण्याचं प्रमाण कमी केलं. सध्या मी दिवसातून दोन किंवा तीन कप चहा पिते, असंही ती म्हणाली.
5 / 8
चहा प्यायल्यानंतर तृप्ती तिचा नाश्ता बनवते. मात्र सकाळचा नाश्ता पोटभर न करता हलकंफुलकं खायला तिला आवडतं. पराठा किंवा भाजी-चपाती असं काही पोटभर खात नसल्याचं तृप्ती म्हणाली. त्याऐवजी ती फळं, ओट्स, मनुके, ड्रायफ्रुट्स किंवा बदाम दूध यांना प्राधान्य देते.
6 / 8
नाश्ता झाल्यानंतर तृप्ती 30 ते 40 मिनिटांचा ब्रेक घेते आणि 11-12 वाजता वर्कआऊट करते. यामध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डियो यांचा समावेश असतो. वर्कआऊटनंतर ती प्रोटीन शेक आणि फळं खाते.
7 / 8
तृप्ती दररोज थोडा वेळ योगसाधनासुद्धा करते. यामुळे फिट राहण्यास आणि स्नायू लवचिक होण्यात मदत होते, असं ती सांगते. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ती जेवणात भात, डाळ आणि भाजी खाते. दुपारच्या जेवणातही ती चपाती खात नाही. याशिवाय लोणचं, पापड आणि दही यांचाही जेवणात समावेश असतो.
8 / 8
तृप्ती संध्याकाळी डान्स क्लासला जाते आणि त्याआधी एक कप चहा पिते. डान्स क्लासवरून घरी आल्यानंतर ती फ्रेश होते आणि रात्री 10 वाजण्याच्या आधी जेवण करते. रात्रीच्या जेवणात अंडे, डाळ, सूप किंवा भाज्या यांचा समावेश असतो.