विकी भैय्याच्या घरापुढे अंबानींचंही घर फिकं.. ‘तहलका’ने दाखवली झलक
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे मुंबईत 8 बीएचके आलिशान फ्लॅटमध्ये राहतात. या घराची झलक नुकतीच युट्यूबर तहलकाने त्याच्या व्हिडीओद्वारे दाखवली. मुकेश अंबानी यांच्यानंतर थेट विकी भैय्याचंच घर, असं त्याने म्हटलंय.
1 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं. हे दोघं मुंबईत महालासारख्या सुंदर आणि आलिशान घरात राहतात. 'बिग बॉस 17'च्या घरात विकी आणि अंकिता दोघं स्पर्धक म्हणून एकत्र गेले होते. हा शो संपल्यानंतर त्यांनी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना घरी आमंत्रित केलं.
2 / 5
प्रसिद्ध युट्यूबर सनी आर्या उर्फ तहलकाने त्याच्या युट्यूब चॅनलवर अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक दाखवली आहे. हे घर पाहून तुमचेही डोळे चक्रावतील. तहलकाने अंकिता-विकीच्या या घराची थेट मुकेश अंबानींच्या बंगल्याशी केली आहे.
3 / 5
"आता थोडं थोडं पाहून घ्या, इतकं मोठं घर मुंबईत अंबानींनंतर फक्त विकी भैय्याचंच असेल", असं तो या व्हिडीओत म्हणतोय. "मित्रांनो, विकी भैय्याचं हे घर कोट्यवधींचं आहे. कितीही चालत गेलात तरी हे घर संपत नाही. घरात टॉप क्लास सुविधा आहेत", असंही तो सांगतो.
4 / 5
अंकिता आणि विकीच्या या आलिशान घरात होम थिएटर आणि तीन स्विमिंग पूल आहेत. तहलकाने तिच्या घरातील इतर गोष्टीही दाखवल्या आहेत. अंकिता-विकीच्या या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचं कळतंय.
5 / 5
अंकिता आणि विकीने लग्नापूर्वी 2019 मध्ये हे घर खरेदी केलं होतं. मात्र या घराचं इंटेरिअर डिझाइन पूर्ण होईपर्यंत विकी अंकिताच्या घरी राहत होता. आता बिग बॉस या शोमधून दोघांनी चांगलीच कमाई केली आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी विकी आणि अंकिताला तगडं मानधन मिळत होतं.