Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉडी बिल्डर ते अभिनेता, ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुनचा प्रवास

झी मराठी वाहिनीवर 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम हा अर्जुनची भूमिका साकारतोय. रोहितचा इथपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे.

| Updated on: Dec 06, 2023 | 12:12 PM
झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुराम हा असा सर्वगुण संपन्न मुलगा आहे, ज्याच्या कलेचं कौतुक करू तितकं कमी आहे. फक्त अभिनयातच नाही तर रोहितने इतरही काही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

1 / 6
शाळेत असताना रोहित वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकवायचा. तिथून त्याच्यातील कलाकार घडत गेला. वक्तृत्त्वमध्ये अव्वल असल्यामुळे कॉलेजमध्ये रोहितला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. रोहितच्या फक्त जिभेवर सरस्वती विराजमान नाही तर त्याच्यावर बजरंगबलीचा आशिर्वाद आहे.

2 / 6
2017 मध्ये रोहितने 'मिस्टर इंडिया'च्या  स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 2006 पासून त्याने बॉडी बिल्डिंगचं प्रशिक्षण सुरु केलं आणि राष्ट्रीय स्तरावर त्याने बरीच पारितोषिकंही पटकावली आहेत. त्यानंतर त्याने  पुण्याला स्वतःची व्यायामशाळा सुरु केली.

3 / 6
जवळपास 650 प्रशिक्षणार्थी त्याच्याकडून प्रशिक्षण घेत होते. यासोबतच रोहित एक चांगला आहारतज्ज्ञ आहे आणि आज तो काही लोकांना डाएट प्लॅन सांगतो. 2018 मध्ये त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. इथूनच एक कलाकार म्हणून त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली.

4 / 6
रोहित हा विक्रम गोखले गुरुजींचा विध्यार्थी आहे. त्यांच्याकडून त्याने अभिनयाचा अभ्यास केला आणि स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर सर्वात आधी तो शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला पाहण्यासाठी गेला. रोहित हा शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे.

5 / 6
रोहितच्या या प्रवासात त्याच्यासोबत असणारी एक खास व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी. माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याची शिल्पकार  माझी बायको पूजा आहे, असं तो म्हणतो. अभिनय, बॉडी बिल्डिंग यांसोबतच रोहितला उत्तम स्वयंपाक करता येतो.

6 / 6
Follow us
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.