प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या आश्रम वेब सीरीजची सध्या बरीच चर्चा आहे. आश्रमचा 3 भाग MX Player वर रिलीज झाला आहे. समाजकारण, राजकारणावर आधारित असलेल्या या वेब सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्सही आहेत.
बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांच्यावर चित्रीत केलेले काही बोल्ड सीन्सची बरीच चर्चा आहे. ईशाची आश्रमच्या तिसऱ्या भागात एंट्री झाली आहे. ईशा सोनिया नावाच्या एका महिलेची व्यक्तिरेखा साकारत आहे.
सीरीजमध्ये ईशा गुप्ता आणि बॉबी देओलमध्ये काही इंटीमेट सीन्स चित्रीत झाले आहेत. बॉबी देओल सोबत असे सीन्स करताना काही अडचण आली नाही, असं ईशाने सांगितलं.
वयाचा विचार केल्यास ईशा गुप्ता बॉबी देओलपेक्षा 17 वर्षांनी छोटी आहे. खूप सहजतेने हे इंटीमेट सीन्स शूट केलेत.
आश्रम सीरीजमध्ये बॉबी देओलने त्याच्यापेक्षा निम्म्यावयाच्या अभिनेत्रींसोबत बोल्ड सीन्स केलेत.
सीरीजच्या पहिल्या भागात अभिनेत्री त्रिधा चौधरीने हॉट सीन्स दिले होते. त्रिधा बॉबीपेक्षा 25 वर्षांनी छोटी आहे.
बॉबी सोबत लव मेकिंगचा सीन शूट करण्याआधी त्रिधाने अनेक तास उशी सोबत प्रॅक्टीस केली होती.
आश्रमच्या दुसऱ्याभागात आदिती पोहनकर आणि बॉबी देओलमध्येही असे काही सीन्स आहेत. आदिती बॉबी पेक्षा 26 वर्षांनी लहान आहे.
अभिनेत्री अनुरिता झा ने सुद्धा बॉबी सोबत काही इंटिमेट सीन्स दिलेत. बॉबी पेक्षा ती 18 वर्षांनी लहान आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं, वडिलांची परवानगी घेऊन तिने लव मेकिंगचे सीन्स शूट केले होते.
आश्रम ही आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवर आधारीत वेब सीरीज आहे. एक सामाजिक वास्तव यातून मांडण्यात आलं आहे.