एचएस प्रणॉय भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू आहे. भारताच्या थॉमस कप विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आयुष्यात आता एक नवी सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारताच नाव उज्वल केलं. बुधवारी तो विवाहबंधनात अडकला.
प्रणॉयने गर्लफ्रेंड श्वेता रेचल थॉमस बरोबर लग्न केलं. दोघे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांनी कोर्ट मॅरेजचा निर्णय घेतला. प्रणॉयने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यात त्याचे कुटुंबीय फोटोमध्ये दिसत आहेत.
लग्नासाठी दोघांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. प्रणॉयने गुलाबी रंगाचा शर्ट आणि लुंगी नेसली होती. श्वेताने क्रीम रंगाची साडी परिधान केली होती. फोटो कॅप्शनमध्ये प्रणॉयने 'Theeeeeeee Day' असं लिहिलं आहे.
प्रणॉयची बायको श्वेताचा जन्म कुवेतमध्ये झाला. ती डिजिटल फॅशन क्रिएटर आहे. अमेरिकन लग्जरी ब्रँड 'साक्स'मध्ये ती काम करते. प्रणॉयने या महिन्याच्या सुरुवातीला श्वेतासोबत फोटो शेयर केला होता. त्याआधी त्याने कधीही गर्लफ्रेंडचा उल्लेख केलेला नाही.
प्रणॉयच्या लग्नाने त्याचे सहकारी खेळाडू उत्साहित आहेत. सायना नेहवालने कमेंटमध्ये 'दिल वाले दुल्हनियां ले जाएंगे' असं म्हटलं आहे. 17 सप्टेंबरची वाट पाहतोय, असं सात्विक साईराजने लिहिलं आहे.