आजच्या घडीला प्रत्येकाचा विमा (Insurance) असणं आणि गुंतवणूक करणं आवश्यक झालं आहे. मात्र, जास्त प्रीमियममुळे प्रत्येकालाच ते परवडेल असं नाही. अशात सरकारने गरीब आणि दुर्बल घटकांनाही विम्याचा लाभ मिळावा यासाठी स्वस्तात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) कमी प्रीमियमसह सुरू केली आहे.
या योजनेमध्ये पीएमएसबीवाय अंतर्गत खातेधारकांना 2 लाखांचा अपघात जीवन विमा (Life Insurance) मिळणार आहे. तर कायमस्वरुपी अपंगत्व असल्यास 1 लाख रुपये विम्याची रक्कम असणार आहे. दरमहा फक्त 12 रुपये प्रीमियम भरून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता.
काय आहे योजना ? - PMSBY योजनेसाठी 18 ते 70 अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खातं असणं बंधनकारक आहे. यामध्ये विमा घेणार्याचा मृत्यू, अपघात किंवा संपूर्ण अपंगत्व असल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो.
महागाई भत्त्यातील पहिला बदल जानेवारी ते जून या काळात होतो आणि दुसरे बदल हा जुलै ते डिसेंबर या काळात केला जातो.
कसं कराल अप्लाय? - सरकारच्या या खास योजनेमध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी खाते धारक कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर सरकारच्या वेबसाईटवरुनसुद्धा तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.
या गोष्टी लक्षात असूद्या - PMSBY योजनेसाठी वर्षाला 12 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागणार आहेत. जर प्रीमियम वेळेवर जमा नाही झाला तर पॉलिसी रद्द होऊ शकते.
यामध्ये बँक खात्यातून प्रीमियम थेट ऑटो डेबिट करण्याची सुविधा आहे. जेव्हा बँक खात्यात प्रीमियमची कोणतीही रक्कम नसते तेव्हा पॉलिसी रद्द केली जाते. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पॉलिसाला लागणार पैसे असणं आवश्यक आहे.