बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यापासून तिच्या हातातील मोठे मोठे चित्रपट गेले आहेत. आणि नवीन चित्रपट देखील तिला मिळत नाहीयेत. अगोदर 'हिरोपंती 2' आणि आता अॅनिमल हे चित्रपट तिच्या हातातून गेले आहेत.
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, अॅनिमलचे निर्माते संदीप रेड्डी वंगा यांनी चित्रपटासाठी सारा अली खान ऐवजी तृप्ती डिमरीला घेतले आहे.
ज्यानंतर सारा अली खानला मुंबईतील चित्रपट निर्मात्यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट केले गेले. सारा अली खानचा विशेष फोटो पहा.
रिपोर्टनुसार तृप्तिचे ऑडिशन टेप मेकर्स यांना आवडले आहे आणि त्यांनी तृप्तिला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आहे. सारा अली खाननेसुद्धा या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, परंतु निर्मात्यांना तृप्तिचे काम आवडले आहे.
सारा अली खानने निळा आणि काळा ओव्हरकोट घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
साराला अली खान नुकताच 'कुली नंबर 1' मध्ये दिसली. 'कुली नंबर 1' ला म्हणावे यश मिळाले नाही. या चित्रपटात सारा आणि वरूणसोबत दिसले. मात्र, या चित्रपटातील साराचा अभिनय चाहत्यांना आवडला नाही.