वयाच्या 22 व्या वर्षी 11 मुलं, करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या जोडीला हवे आहेत तब्बल 105 मुलं !
कुणाला कशाची हौस असेल काही सांगता येत नाही. जॉर्जिया येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला तर तब्बल 105 अपत्यांची हौस आहे. त्यांना एकूण 105 मुल-मुली पाहिजेत. जगात सर्वात जास्त मुलांचा पालक होण्याची त्यांची इच्छा आहे.
1 / 5
मुंबई : कुणाला कशाची हौस असेल काही सांगता येत नाही. जॉर्जिया येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला तर तब्बल 105 अपत्यांची हौस आहे. त्यांना एकूण 105 मुल-मुली पाहिजेत. जगात सर्वात जास्त मुलांचा पालक होण्याची त्यांची इच्छा आहे.
2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार या जोडीचे नाव क्रिस्टीना ओझटर्क आणि गॅलीप असे आहे. क्रिस्टीना यांचे वय 23 वर्ष असून त्यांचे पती गॅलीप 56 वर्षांचे आहेत. गॅलीप एक उद्योजक असल्यामुळे या दाम्पत्याकडे करोडो रुपये आहेत. अतिशय श्रिमंत असलेल्या या दाम्पत्याला एकूण 105 अपत्ये हवी आहेत. सध्या त्यांना 11 छोटी छोटी मुलं आहेत.
3 / 5
क्रिस्टीना आणि गॅलीप यांना 105 मुलं आणि मुलींना जन्माला घालून इतिहास रचण्याची इच्छा आहे. त्यासाठी ते सध्या सरोगसीची मदत घेत आहेत. मला आई होणं आवडतं त्यामुळे आम्हाला 105 मुलं हवी आहेत, असं क्रिस्टीना सांगतात.
4 / 5
या दाम्पत्याला आणखी मुलांना जन्माला घालायचं आहे. त्यासाठी त्यांच्याकडे असलेले पैसे ते खर्च करण्यास तयार आहेत. 105 मुलांचा हा आकडा पार करायचा असल्याचे या दोघांचेही मत आहे. तशी सहमती या दोघांमध्ये झालेली आहे.
5 / 5
सध्या या दाम्पत्याला 11 मुलं आहेत. यातील सर्वात मोठी सहा वर्षांची मुलगी आहे. या मुलीला क्रिस्टीना यांनी जन्म दिला आहे. बाकी सर्व 10 आपत्ये ही सरोगेसीच्या मदतीने जन्माला घालण्यात आलेले आहेत.