राज्यातील भाजपाचा झंझावात, गोपीनाथ मुंडे यांची आज जंयती, लोकनेत्याचा जाणून घ्या जीवन प्रवास

Gopinath Munde Birth Anniversary : भाजपाला राज्यात पोषक वातावरण तयार करणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. बीडच नाही तर राज्यभर त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य लोक पण आहेत. असा होता या लोकनेत्याचा जीवन प्रवास...

| Updated on: Dec 12, 2024 | 10:05 AM
भाजपाला राज्यात संजीवनीच नाही तर ओबीसी चेहरा देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कायम लोकांच्या आठवणीत आहेत. राजकीय गप्पांचा फड रंगला तर तो गोपीनाथ मुंडे यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती आहे. राज्यात भाजपाचा झंझावात आणायचे श्रेय त्यांनाच जाते.

1 / 6
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा येथे झाला. बीड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता. त्यांनी आणि प्रमोद महाजन यांनी भाजपाला राज्यात मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. राज्यात या पक्षाची पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

2 / 6
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. इंदिरा गांधींच्या काळात देशात आणीबाणी लागली. त्याला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांना अटक झाली. नाशिकच्या तुरूंगात टाकण्यात आलं. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

3 / 6
1982 मध्ये ते महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस झाले. पुढे 1986 मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. 2009 मध्ये राज्य भाजपाचे प्रभारी आणि लोकसभेतील भाजपाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपाचे स्टार प्रचारक होते.

4 / 6
गोपीनाथ मुंडे यांनी 1980 ते 1985 आणि 1990 ते 2009 या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांनी कामं केले. 1992 ते 1995 या काळात ते राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. राज्यात 1995 मध्ये महायुतीचे सरकार आले. या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री पदी होते.

5 / 6
2014 मध्ये बीड लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी विजयी झाले. लोकसभेत भाजपाच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. 26 मे 2014 रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. 3 जून 2024 रोजी नव दिल्लीत एका रस्ता अपघातात त्यांचे निधन झाले.

6 / 6
Follow us
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.