
बाॅलिवूड अभिनेता गोविंदा याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. गोविंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा चित्रपटांपासून दूर आहे.

गोविंदाने मोठा खुलासा केलाय. गोविंदा म्हणाला की, मला बऱ्याच आॅफर चित्रपटांसाठी आल्या. मात्र, मी अनेक चित्रपटांना नकार दिले. कारण मला काहीतरी वेगळे करायचे होते.

हेच नाही तर निर्माते मला त्या भूमिकांसाठी चांगला पैसाही देण्यास तयार होते. मी चित्रपट साईन करताना खूप जास्त विचार करतो. मात्र, मी कितीतरी चित्रपटांना नकार दिला.

गोविंदाने पुढे म्हटले की, मी काय करतोय या विचाराने आरशासमोर येऊन स्वत:लाच मारले. मी कोणताही चित्रपट का साईन करत नाही हे मलाच कळत नाही. गोविंदानेच सांगितले की, त्याने 100 कोटींच्या चित्रपटाच्या आॅफरलाही नकार दिला.

आता गोविंदाच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. गोविंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गोविंदा नेहमीच चर्चेत असतो.