बॉलीवूड अभिनेत्री व ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हल सहभागी झाली आहे. कान्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चन शानदार एंट्री करत ऐश्वर्याने धुमाकूळ घातला आहे.
कान्समधील ऐश्वर्याचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा लूकही खूपच प्रेक्षणीय होता. तिसर्या दिवशीही ऐश्वर्याने स्कॅल्प गाउनचा आऊट फीट परिधान केला होता. गौरव गुप्ताने या स्कॅल्प गाऊन डिझाईन केला आहे.
ऐश्वर्याने गाऊनच्या आऊटफीटबरोबरच ड्रामाटिक आय मेकअप केल्याने तिचे ग्लॅमरस लुक आणखीनच खुलून दिसत आहे
ऐश्वर्याने स्टायलिश गाऊनवर मिनिमल ज्वेलरी घातली होती, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. ऐश्वर्याच्या हास्यने आणि डोळ्यांनी उपस्थित चित्रपट प्रेमींवर सगळ्यांवर जादू केली आहे.