बॉलीवूड अभिनेत्रीने बऱ्याच दिवसांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. यात ती मेकअपशिवलाय दिसून येतेय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. हातात कॉफी मग घेऊन तिने काढलेला फोटो चाहत्यांना आवडतोय.
श्रद्धाला फिटनेस फ्रिक देखील म्हटलं जातं. ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. यासाठी ती नियमित जिम करते. त्याचमुळे ती नेहमी फ्रेश दिसते.
तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. तिच्या सौंदर्याचं चाहते कौतुक केलं आहे
श्रद्धा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याला तिचे चाहते भरभरून दाद देत असतात. श्रद्धाने आशिकी 2, एक विलन, हैदर, ABCD 2, बागी, हाफ गर्लफ्रेंड, स्त्री, साहो, छिछोरे या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
श्रद्धा कपूर बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. भुवन बामसोबत त्यांचा एक म्युझिक व्हिडिओ होता. त्याचबरोबर ती प्रभासच्या 'साहो' चित्रपटातही दिसली होती. ती लवकरच अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.