Marathi News Photo gallery Career options for woman according to reports which field they can choose with pcm and pcmb after 12th
महिलांसाठी हे आहेत 5 बेस्ट करिअर ऑप्शन्स!
Career Options: एका रिपोर्टनुसार 2023 मध्ये करिअरचे काही पर्याय असे आहेत जे महिलांना चांगले यश देऊ शकतात आणि महिला या क्षेत्रात भरपूर कमाई करू शकतात. जाणून घ्या या क्षेत्रांविषयी...
1 / 6
आजच्या काळात स्त्री आणि पुरुषांमधील दरी संपुष्टात आली आहे. आता कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात कुणाचेही वर्चस्व राहिले नाही, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकजण प्रवेश करत आहे. मात्र, एका रिपोर्टनुसार 2023 मध्ये करिअरचे काही पर्याय असे आहेत जे महिलांना चांगले यश देऊ शकतात आणि महिला या क्षेत्रात भरपूर कमाई करू शकतात. जाणून घ्या या क्षेत्रांविषयी...
2 / 6
3 / 6
एअरोस्पेस इंजीनियर: एक एअरोस्पेस इंजिनिअर विमान आणि अंतराळयानांच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनावर काम करतो. एक तर हे क्षेत्र अतिशय हुशारांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. दुसरं म्हणजे त्यात पैसा चांगला आहे. याशिवाय महिलांना या क्षेत्रात खूप प्रगतीची संधी आहे.
4 / 6
फार्मासिस्ट: फार्मासिस्ट रुग्णालये आणि औषध कंपन्यांसाठी काम करतात. आरोग्य सेवा उद्योगात ते नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्याचबरोबर कोविड-19 नंतर या क्षेत्रात मोठी तेजी आली असून, पुढील अनेक वर्षे ती तशीच राहण्याची शक्यता आहे. मुली या क्षेत्रात करिअर करू शकतात. या क्षेत्रात मोठ्या पगारात नोकऱ्या सहज उपलब्ध होतात.
5 / 6
वकील: या क्षेत्रात तुम्हाला कॉर्पोरेट लॉ, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी लॉ किंवा मेडिकल लॉ यापैकी एका बीटमध्ये स्पेशलायझेशन मिळालं तर तुम्ही जबरदस्त पैसे कमावू शकता. यामध्ये महिला यशस्वी करिअर करू शकतात. ही सर्वात जास्त पगार देणारी नोकरी आहे.अनुभव असल्यास या क्षेत्रात वर्षाला ५ ते १० लाख रुपये सहज कमावता येतात.
6 / 6
सोशल मीडिया जॉब्स: मुली या क्षेत्रात करिअर करून चांगले पैसे कमवत आहेत. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत.