चंद्रयान 3 च प्राथमिक उड्डाण झालं आहे. चंद्रयान यशस्वीरित्या अवकाशाच्या दिशेने झेपावलं आहे. भारताची ही महत्वाकांक्षी मोहिम असून चंद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.
Image Credit source: ANI
Follow us
LMV-3 रॉकेटद्वारे चांद्रयान 3 च प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
चांद्रयान 3 मध्ये सहाचाकी लँडर आणि रोव्हर आहे. रोव्हर चंद्रावर माती आणि दगडाचा अभ्यास करेल.
ठरवलेल्या निकषानुसार चांद्रयान 3 च प्राथमिक उड्डाण झालं आहे. चंद्रयान यशस्वीरित्या अवकाशाच्या दिशेने झेपावलं आहे.
श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिम यशस्वी करण्यात आली
चंद्रावरच्या स्थितीशी जुळवून घेण्यासाठी लँडरच्या डिजायनिंगमध्ये बदल केला आहे. रोव्हरची टेक्नोलॉजीही तिच असेल.
इस्रोच्या कार्यालयात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. स्टेज 1 यशस्वी झालं आहे.
चंद्रावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग करणे, चंद्रावर सुरक्षितपणे रोव्हर उतरविणे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा शास्रीय प्रयोगात्मक अभ्यास करणे ही तीन उद्दिष्ट्ये या चांद्रयान मोहिमेची आहेत.
“चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली की, भारत दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा जगातला पहिलाच देश ठरेल.
चांद्रयान 3 आकाशात झेपावताच नागरिकांनी टाळ्या वाजवून जल्लोष साजरा केला.