Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चिनी कम’ फेम अभिनेत्रीने वयाच्या 25 व्या वर्षी केलं लग्न, पहा फोटो

'चिनी कम' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्विनी खराने नुकतंच लग्न केलंय. जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत धूमधडाक्यात तिचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Dec 28, 2023 | 3:40 PM
अमिताभ बच्चन आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला 'चिनी कम' हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारलेली अभिनेत्री स्विनी खरा ही नुकतीच लग्नबंधनात अडकली. बुधवारी 27 डिसेंबर रोजी तिचा लग्नसोहळा अत्यंत धूमधडाक्यात पार पडला.

1 / 5
स्विनीने उर्वीश देसाईशी लग्नगाठ बांधली. अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर ती वकिलीकडे वळली आणि त्यातच पुढे करिअर करू लागली. राजस्थानमधील एक पॅलेसमध्ये अत्यंत शाही पद्धतीने स्विनीचा विवाहसोहळा पार पडला. वयाच्या 25 व्या वर्षी तिने लग्न केलं आहे.

2 / 5
स्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्नासोबतच स्विनी आणि उर्वीशच्या हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमाचेही व्हिडीओ समोर आले आहेत. स्विनीचा पती उर्वीश हा इंजीनिअर आहे.

3 / 5
स्विनीने बालकलाकार म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. विद्या बालन आणि सैफ अली खान यांच्या 'परिणीता' या चित्रपटातही ती झळकली होती. तर शाहिद कपूरच्या 'पाठशाला'मध्येही तिने भूमिका साकारली होती. मात्र 'चिनी कम' या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.

4 / 5
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातही स्विनीने भूमिका साकारली. याशिवाय 'बा बहु और बेबी', 'दिल मिल गये', 'जिंदगी खट्टी मिठी' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलंय. सीआयडीच्या एका एपिसोडमध्येही तिने भूमिका साकारली होती.

5 / 5
Follow us
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.