Photo Gallery | छत्रपती संभाजी राजेंची पैनगंगा परिसरातील दुर्गम जंगलात भ्रमंती…!
नांदेडः कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले. त्यांना फिरण्याची भारी आवड. आज छत्रपती संभाजी राजेंनी नांदेडच्या दुर्गम भागातील जंगलात पहाटे भ्रमंती केली. किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील जंगल त्यांनी पिंजून काढले. पैनगंगा नदी परिसरातील जंगल पाहिले नव्हते. त्यामुळे ते मुद्दाम पाहायला आल्याचे राजेंनी सांगितले. या भागातील पर्यटन वाढवण्यासाठी मोठा वाव असून, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्वांनीच जंगलाचे संगोपन आणि संवर्धन करावे, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी स्थानिक वन अधिकाऱ्यांजवळ व्यक्त केली.
Most Read Stories