Chiranjeevi: मेगास्टार चिरंजीवी ‘या’ कारणासाठी गेला आहे अमेरिकेत

| Updated on: Jul 26, 2023 | 10:33 AM

दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेता चिरंजीवी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका मोठ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. अभिनेता पत्नीसोबत अमेरिकेसाठी रवाना झाला होता... ज्यामागचं कारण आता समोर आलं आहे...

1 / 5
 मेगास्टार चिरंजीवी याने नुकताच 'भोला शंकर' सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. सिनेमाचा ट्रेलर २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. सध्या अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.

2 / 5
'भोला शंकर'च्या शूटिंगनंतर चिरंजीवी पत्नी सुरेखा यांच्यासोबत अमेरिकेत गेला होता. दोघे परदेशात फिरायला गेले असल्याच्या चर्चा रंगल्या. पण चरंजीवी एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला जाणार असल्याचं उशिरा समजलं.

3 / 5
 गेल्या काही दिवसांपासून चिरंजीवी याच्या पायाचं दुखणं प्रचंड वाढलं होतं. चिरंजीवी याच्या शस्त्रक्रियेची बाब सुरुवातील गुप्त ठेवण्यात आली होती. पण आता अभिनेत्याचं पत्नीसोबत अमेरिकेत जाण्याचं कारण समोर आलं आहे.

4 / 5
 चिरंजीवी याच्या पायाला काय झालं कळू शकलेलं नाही, पण अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती चिरंजीवी याच्या जवळच्या मित्रांनी दिली आहे. सध्या सर्वत्र चिरंजीवी याच्या प्रकृतीची आणि त्याच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.

5 / 5
चिरंजीवी याचा 'भोला शंकर' सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनला देखील हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, मोठी मुलगी सुष्मिताच्या मालकीच्या गोल्ड बॉक्स एंटरटेनमेंट्स प्रॉडक्शन कंपनी अंतर्गत अभिनेता आणखी एका नवीन सिनेमात काम करणार आहे.