पु.ल.देशपांडेंच्या जयंती निमित्ताने रसिकांसाठी खास भेट, मातब्बर कलाकारांच्या आवाजात ऐकता येणार पु.लंची पुस्तकं!
आज अर्थात 8 नोव्हेंबर 2021 रोजी, पु. ल. देशपांडे यांची 102 वी जयंती आहे. त्यानिमित्त स्टोरीटेल मराठीवर पुलंच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकांची भेट स्टोरीटेलच्या श्रोत्यांना मिळणार आहे. पुलंनी लिहिलेले वेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतर कलावंत, साहित्यिकांना लेखनातून दिलेली ‘दाद’, तसेच त्यांचे काही हलकेफुलके व वैचारिक स्वरूपाचे लेखनही आहे.
Most Read Stories