छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन करत आहे.
आता ही मालिका एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे.
दरम्यान आता संजनाला लगीनघाई आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रचंड मजेदार मीम्स तयार केले आहेत.
कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे. तर संजना आता घर आपल्या दाब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.
सोशल मीडियावर आता अनिरुद्ध आणि संजनाच्या लग्नाची एक हटके पत्रिका धुमाकूळ घालतेय. ही पत्रिका पाहून तुम्हालाही हसू येईल.
जेवणाच्या ताटावर अरुंधतीच्या आईने आपल्या मुलीच्या दुःखाने अश्रू ढाळले. यावरही मीम तयार करण्यात आलं आहे.