अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने नुकताच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये भूमिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
चित्रपट फ्लाॅप जात असतानाच भूमि बोल्ड लूकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे भूमीचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.
या नव्या फोटोशूटमध्ये भूमी पेडणेकर ही इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.
भूमी पेडणेकरच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. चाहते भूमिला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील देत आहेत.
भूमी पेडणेकर हिच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. कारण 2023 मध्ये भूमिचे तब्बल सात चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.