बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती सतत तिचे सर्वोत्कृष्ट फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या पतीसोबत अनेक फोटो शेअर केले.
काजल अग्रवाल तिचे नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. नुकतंच तिनं हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. काजल अग्रवाल दक्षिणची सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील बड्या चित्रपटांमध्येही तिनं भक्कम भूमिका साकारल्या आहेत.
काजल तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ती अनेकदा सांगते की तिच्या आरोग्याची रहस्यं नैसर्गिक गोष्टी आहेत.
काजल अग्रवालनं दक्षिणेच्याच चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं होतं. आज तिनं इंडस्ट्रीत एक मोठं नाव कमावले आहे. यासह तिनं अक्षय कुमार, अजय देवगन यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
गेल्या वर्षी काजलनं 30 ऑक्टोबर 2020 रोजी प्रियकर गौतम किचलूशी लग्न केलं होतं. आता हे दोघं मुंबईत एकत्र राहतात.