निळ्या रंगाची नवलाई अन् खट्याळ हसू, नऊवारी साजात शोभून दिसतेय अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी!
मराठमोळी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने निळ्या रंगांच्या नऊवारी साजात नवरात्री स्पेशल फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ‘जर्नी प्रेमाची’, ‘कॅरी ऑन मराठा’ अशा मराठी चित्रपटांमध्ये झळकली आहे.
1 / 5
आज (13 ऑक्टोबर) देशभरात उत्साहाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाचा आज सातवा दिवस आहे. या दिवसांतील नऊ मानाच्या रंगांपैकी आज ‘निळ्या’ रंगाचा दिवस आहे.
2 / 5
सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम दिसत आहे. देवी आईच्या आगमनाचा हा सण उत्साहाने साजरा केला जात आहे.
3 / 5
सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.
4 / 5
या रंगांच्या ट्रेंडमध्ये आपल्या अभिनेत्री कशा मागे राहतील बरं... अशीच एक मराठमोळी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने निळ्या रंगांच्या नऊवारी साजात नवरात्री स्पेशल फोटोशूट केलं आहे. हे फोटो छायाचित्रकार स्वप्नील रास्ते यांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केले आहेत.
5 / 5
अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ‘जर्नी प्रेमाची’, ‘कॅरी ऑन मराठा’ अशा मराठी चित्रपटांमध्ये झळकली आहे. या खास फोटोशूटमध्ये कश्मीराने निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि पारंपारिक दागिने परिधान केले आहेत.