अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांसाठी तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे फोटोही पोस्ट होताच व्हायरल होतात.
सोनाली राऊत बिग बॉस 8 या रिअॅलिटी शोचा एक भाग होती. या शोमध्ये सोनालीनं धमाकेदार काम केलं. ज्यामुळे ती चर्चेत होती.
सोनाली नेहमीच सोशल मीडियावर स्वत:चे बिकीनीमधील फोटो शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.
सोनाली किंगफिशरची कॅलेंडर गर्ल होती. ज्यानंतर ती 2014 मध्ये एक्सपोज या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात हिमेश सोनालीसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता.
सोनालीनंही डिजिटल डेब्यू केला आहे. बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हरसोबत विक्रम भट्टच्या सिरीजमध्ये ती दिसली होती.
सोनालीचं एक फोटोशूट प्रचंड व्हायरल झालं होतं. यात ती अभिनेता रणवीर सिंगसोबत दिसली होती. या फोटोमध्ये सोनाली टॉपलेस होती.