
बिग बाॅस 16 मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अब्दु रोजिक हा. अब्दु रोजिक याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. शिव ठाकरे, साजिद खान यांच्यासोबत मस्ती करताना अनेकदा बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिक दिसला.

अब्दु रोजिक हा एक इंटरनॅशनल स्टार असून अब्दु हा कजाकिस्तानचा गायक असून तो दुबईमध्ये राहतो. बिग बाॅसच्या घरात दाखल होताच अब्दु रोजिक याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये.


द कपिल शर्मा शोमध्ये अब्दु रोजिक दिसणार आहे. सलमान खान याच्यामुळे अब्दु रोजिक याला कपिल शर्मा याच्या शो मिळाला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सलमान खान हा कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांपैकी एक आहे.

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अब्दू रोजिक हा सलमान खान याच्यासोबत मस्ती करताना दिसला होता. ओ ओ जाने जाना या गाण्यावर तो सलमान खान याच्यासोबत डान्स करताना दिसला होता.