
द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने कमाईमध्ये अनेक बाॅलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. काही ठिकाणी सतत चित्रपटाला विरोध हा केला जातोय.

द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे. अदा शर्मा हिने नुकताच तिच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आपल्या आगामी चित्रपटासाठी आपण खूप जास्त इच्छुक असल्याचे देखील अदा हिने म्हटले.


अदा शर्मा हिच्या या चित्रपटात श्रेयश तळपदे हा देखील मुख्य भूमिकेत आहे. आता ही जोडी मोठ्या पडद्यावर काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अदा सध्या प्रचंड चर्चेत आहे.

द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यापासून अदा शर्मा ही फोकसमध्ये आलीये. विशेष म्हणजे अदा शर्मा ही द केरळ स्टोरी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली होती.