Aishwarya Rai birthday | ‘ब्युटी विथ ब्रेन’ ऐश्वर्या राय बच्चन करोडोंची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्ती बद्दल सर्वकाही
ब्युटी विथ ब्रेन अशी ओळख असणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज 47 वा वाढदिवस आहे. ऐश्वर्या राय ही नेहमीच मोहक सौंदर्य, प्रतिभा आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आज वाढदिवसाच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या एश्वर्याबाबत काही खास जाणून घेऊयात.
1 / 8
ब्युटी विथ ब्रेन अशी ओळख असणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज 47 वा वाढदिवस आहे. ऐश्वर्या राय ही नेहमीच मोहक सौंदर्य, प्रतिभा आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आज वाढदिवसाच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या एश्वर्याबाबत काही खास जाणून घेऊयात.
2 / 8
ऐश्वर्याला सुरवातीला वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवायचे होते. पण,नंतर तिने हा विचार सोडला आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्यासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. पण नंतर मॉडेलिंगसाठी आपले शिक्षण सोडले.त्यानंतर तिनं स्वत:च्या मनमोहक सौंदर्यानं आणि कसदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष जागा बनवली. वयाच्या अवघ्या 21 वर्षी म्हणजेच 1994 मध्ये तिनं मिस वर्ल्डचा किताब जिंकला.
3 / 8
२००६ मध्ये जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश भारत दौर्यावर आले होते तेव्हा ऐश्वर्याला जेवणासाठी अमंत्रित केले होते.परंतु,अॅश या कार्यक्रमाला हजर राहिली नव्हती.
4 / 8
caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती 227 कोटी आहे. त्यांचे मासिक वेतन आणि उत्पन्न 1 कोटींहून अधिक आहे आणि वर्षभरासाठी 12 कोटींहून अधिक आहे.
5 / 8
कॅनॉलेजच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या सध्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत मुंबईत एका आलिशान घरात राहत आहे. याशिवाय ऐश्वर्याकडे 2 घरे आहेत, त्यापैकी एक मुंबईत आहे आणि दुसरे दुबईत आहे. ऐश्वर्याचे दुबईतील घर खूपच आलिशान आहे आणि त्याची बरीच चर्चा झाली आहे.
6 / 8
ऐश्वर्याकडे अनेक लक्झरी कार आहे ज्यात मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि एक मिनी कूपर यांचा समावेश आहे.
7 / 8
ऐश्वर्या चित्रपटांमधून जवळपास 6 कोटी कमावते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती 7 कोटी रुपये घेते. ऐश्वर्याची वैयक्तिक गुंतवणूक 182 कोटी आहे. गेल्या काही वर्षांत ऐश्वर्याची कमाई वाढत आहे. ऐश्वर्याने 2017 मध्ये 9 कोटी, 2018 मध्ये 7 कोटी, 2019 मध्ये 11 कोटी आणि 2020 मध्ये 13 कोटी कमावले होते.
8 / 8
2004 मध्ये ऐश्वर्यानेही तिचे फाउंडेशन सुरू केले. या फाउंडेशनच्या माध्यमातून ती गरजू लोकांना मदत करते. याशिवाय, ऐश्वर्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.