Anant Chaturthi | अंकिता लोखंडेसोबत रंगणार पिंगा, अनंत चतुर्दशीला साजरा होणार नव्या नात्यांचा श्रीगणेशा!

| Updated on: Sep 19, 2021 | 8:28 AM

गणेशाच्या आगमनाने वातावरणात एक अनोखं चैतन्य पसरतं. अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना मात्र डोळे भरून येतात. सध्या प्रत्येक जण विघ्नहर्त्या गणरायाकडे एकच मागणं मागतोय सर्व दुःखांचा नाश होऊ दे आणि या कोरोना रुपी संकटातून बाहेर पडून सर्वाचं जीवन सुरळीत सुरु होऊ दे.

1 / 7

2 / 7
या अनंत चतुर्दशीला आता दुःखांचं विसर्जन आणि सुखाचं आगमन होणार आहे कारण, या अनंत चतुर्दशीला झी मराठीवर "नव्या नात्यांचा श्री गणेशा" होणार आहे.

3 / 7
नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत झी मराठी वाहिनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. आज म्हणजेच अनंत चतुर्दशीला "नव्या नात्यांचा श्री गणेशा" हा विशेष कार्यक्रम झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.

4 / 7
"नव्या नात्यांचा श्री गणेशा" हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहेच आणि याच निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यासाठी हा कार्यक्रम हातभार लावणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नव्या नात्यांचा श्रीगणेशा होणार आहे.

5 / 7
या कार्यक्रमातून धमाल प्रहसन, गाणी आणि डान्स हे सगळंच प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. प्रेक्षकांचे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील लाडके विनोदवीर निर्मिती ताईंसोबत या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.

6 / 7
त्याचसोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे, सोनाली कुलकर्णी, अक्षया देवधर, नेहा खान, अस्मिता देशमुख यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

7 / 7
त्याचसोबत सलील कुलकर्णी, नंदेश उमप, अभिजीत सावंत यांचे सुमधुर परफॉर्मन्सेस सगळ्यांना मंत्रमुग्ध करतील.