अभिनेत्री आणि चंकी पांडेची लेक अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अनन्याचे एका मागून एक चित्रपट रिलीज झाले आहेत. मात्र, चित्रपट काही खास कमाल करू शकले नाहीत.
अनन्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, अनन्याचा एकही चित्रपट हीट ठरला नाहीये. इतकेच नाहीतर लाईगर हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप झाला.
लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर अनन्या पांडेवर फोडण्यात आले. अनन्याने चांगला अभिनय न केल्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
अनन्या पांडे सध्या न्यूयॉर्कमध्ये चांगला वेळ घालवत आहे. इतकेच नाही तर न्यूयॉर्कमधील काही खास फोटो अनन्याने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, अनन्या न्यूयॉर्कमध्ये फुल धमाल करत आहे. अनन्याचे न्यूयॉर्कमधील फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहेत.