पाकिस्तानचा जावई होणार भारतातील ‘हा’ सेलिब्रिटी, 12 वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट?

| Updated on: Dec 18, 2023 | 3:20 PM

झगमगत्या विश्वातील अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगत असतात. अता देखील दोन प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी पाकिस्टानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगत असून दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे.

1 / 5
बॉलिवूडचा गायक आणि रॅपर बादशाह आणि पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी दोघे दुबई याठिकाणी आनंद लुटताना दिसले.

2 / 5
आता अभिनेत्रीचं नाव बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बादशाह याच्यासोबत जोडलं जात आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हानिया आणि बादशाह यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

3 / 5
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांनी बादशाह याचा उल्लेख पाकिस्तानचा जावई म्हणून देखील केला आहे. नुकताच बाहशाह याने सोशल मीडियावर हानिया हिचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अभिनेत्री हसताना दिसत आहे. शिवाय गायकाने कॅप्शनमध्ये, 'जोक काय होता ज्यामुळे तू इतकी हसत आहेस...' असं लिहिलं आहे.

4 / 5
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचं नाव पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. पण क्रिकेटपटूला भाऊ म्हणत अभिनेत्रीने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

5 / 5
अभिनेत्री हानिया आमिर पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.