
'खतरों के खिलाडी'मुळे रोहित शेट्टी आणि भारतीचा नवरा हर्ष लिंबाचिया यांचे चांगले बॉण्डिंग झाले आहे. रोहित नेहमी या दोघांसोबत फनी प्रँक्स खेळताना दिसतो. मात्र, यावेळी रोहित शेट्टीने 'खतरों के खिलाडी'चे नाहीतर 'हुनरबाज' या शोचे सूत्रसंचालन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत केले.

विशेष म्हणजे यावेळी रोहित शेट्टीने प्रेग्नेंट असलेल्या भारतीला खास गिफ्ट देखील दिले. मात्र, गिफ्ट देण्यापूर्वी रोहित शेट्टीने आपल्याच स्टाइलमध्ये भारती आणि हर्ष या दोघांची चांगलीच मजा घेतली.

रोहित शेट्टीने भारती सिंहला दोन टेडी बेअर आणि लहान मुलांचे स्ट्रॉलर दिले. हे गिफ्ट पाहून भारती आणि हर्षला खूप भारी वाटले.

हे गिफ्ट पाहून हर्ष इतका खूश झाला की त्याने रोहित शेट्टीला सांगितले की, सहसा भारती हे करते पण यावेळी मला ते करायचे आहे.

असे म्हणत हर्षने चक्क रोहित शेट्टीची किस घेतली. लवकरच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया आई-वडील होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.