
वूटवर ऑनलाईन स्ट्रीम केल्या गेलेल्या बिग बॉस ओटीटीच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करण जोहरचा वेगळा लूक पाहायला मिळाला.

बिग बॉसच्या या आठवड्यात दिव्या अनेक वेळा रिपीट करताना दिसली की तिला रिअॅलिटी शोबद्दल खूप ज्ञान आहे.

दिव्याने वारंवार सांगितले होते की तिने यापूर्वी दोन रिअॅलिटी शो केले आहेत. एपिसोडच्या सुरुवातीला करणनं दिव्याला स्पष्ट केलं की हा शो तिच्याबद्दल नाहीये. दिव्या स्वतः समोर अक्षरा सिंग, निशांत, मूस कमी मानते.

जेव्हा दिव्या, तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तिनं करण जोहरला सांगितलं की केवळ तिनंच नाही तर करणनं बाकीच्या लोकांनाही या वृत्तीबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. हे ऐकल्यानंतर करणनं दिव्याला सांगितले की शोमध्ये त्यानं पुढे काय करावे हे त्याला सांगण्याची गरज नाही.

दिव्याबरोबरच करणने प्रतिक सहजपाललाही टार्गेट केलं. तो म्हणाला की, असं दिसतं की प्रतिक आणि दिव्यानं बाहेरून स्क्रिप्ट लिहून, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ताची कॉपी करण्याचा प्रयत्न करत शोमध्ये प्रवेश केला आहे.

घरात नेहमी नॉनस्टॉप बोलणारे स्पर्धक दिव्या आणि प्रतीक आज बिग बॉस ओटीटी होस्ट करण जोहरसमोर पूर्णपणे गप्प बसले होते.