अक्षय कुमार : मात्र निक जोनसशी लग्न करण्यापूर्वी तिचे काही संबंध होते. ज्यामुळे ती बर्याचदा चर्चेतही होती. प्रियंका चोप्राचा 'ऐतराज' हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रियंकानं सुंदर काम केलं ज्यामुळे ती ए रात्रीत लोकांच्या नजरेत आली. या चित्रपटात अभिनेत्री अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सोबतच या चित्रपटात करीना कपूर खान देखील होती. मात्र प्रियंकाचं नाव अक्षय कुमारशी जोडलं जाऊ लागलं. सोबतच या चित्रपटानंतर प्रियंका चोप्रा अक्षय कुमारसोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये अंदाज, वक्त सारख्या सिनेमांचा समावेश होता. मात्र जेव्हा दोघांबद्दल बातम्या समोर आल्या तेव्हा अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना मधे आली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ट्विंकल आणि प्रियंका चोप्रा यांच्यात जोरदार वाद झाला तेव्हा ट्विंकल खन्नानं सेटवर कॉल केला होता. यानंतर त्यांचे संबंध तुटले. दरम्यान, ही जोडी सलमान खानसोबत मुझसे शादी करोगीमध्ये दिसली.