दीपिका पादुकोण हिने केला मोठा खुलासा, पठाणच्या यशानंतर थेट शाहरुख आणि गौरी खान यांना म्हणाली…
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. दीपिका पादुकोण ही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता दीपिका पादुकोण हिने एक खास मुलाखत दिलीये.
1 / 5
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही प्रेम मिळाले आहे. हा चित्रपट हिट ठरलाय.
2 / 5
पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
3 / 5
मुळात म्हणजे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या जोडीला चाहत्यांचे कायमच प्रेम मिळते. नुकताच दीपिका पादुकोण हिने एक मुलाखती दिलीये. यावेळी तिने काही मोठे खुलासे देखील केले आहेत.
4 / 5
पठाण चित्रपट हिट ठरल्यानंतर दीपिका पादुकोण ही शाहरुख खान आणि त्याची पत्नी गाैरी खान हिला म्हणाली की, हे प्रेम आणि आशिर्वाद आहे. दीपिका म्हणाली की, या चित्रपटासाठी मी खूप प्रार्थना केल्या होत्या.
5 / 5
दीपिका पादुकोण पुढे म्हणाली की, प्रत्येक व्यक्ती शाहरुख खान याचे यश बघण्यास इच्छुक होता. मला स्वत: ला वाटत होते की, हा चित्रपट शाहरुख आणि त्याच्या कुटुंबासाठी हिट व्हावा.