जान्हवी कपूर सध्या चर्चेत असून ती तिच्या आगामी चित्रपट 'मिली'चे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. यादरम्यान जान्हवीचा जबरदस्त असा लूक पुढे आलाय.
लाल रंगाच्या प्रिंटेड लेहेंग्यात जान्हवीचा लूक एकदम सुंदर दिसत आहे. जान्हवीच्या चाहत्यांना देखील तिचा हा खास लूक आवडलाय.
जान्हवीने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
जान्हवी कपूरने लेहेंग्यासोबतच गळ्यात ब्लू कलरचा सुंदर नेकलेस देखील घातला असून केस मोकळे सोडल्याने जान्हवीचा लूक अधिकच सुंदर दिसत आहे.
जान्हवी कपूरने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना हॅशटॅग Mili असे लिहिले आहे.