Kangana Ranaut | असे काय घडले की, चक्क कंगना राणावत हिने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, म्हणाली मी खूप जास्त…
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कोणत्याही विषयांवर बिनधास्तपणे आपले मत मांडते. काल इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत आपला कोणी पाठलाग करत असल्याचे आणि व्हॉट्सअॅप डेटा लीक होण्याचे आरोप कंगनाने केले होते
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कोणत्याही विषयांवर बिनधास्तपणे आपले मत मांडते. काल इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत आपला कोणी पाठलाग करत असल्याचे आणि व्हॉट्सअॅप डेटा लीक होण्याचे आरोप कंगनाने केले होते. यावेळी तिने जरी पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरीही कंगनाचा निशाना कोणावर होते हे जवळपास सर्वांनाच समजले.
2 / 5
आता परत कंगना राणावत हिने इंस्टा स्टोरीवर अजून एक पोस्ट शेअर केलीये. इतकेच नाही तर या पोस्टमध्ये तिने थेट घरामध्ये घुसून मारण्याची धमकीच देऊन टाकलीये. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की, मी वेडी आहे ते तुम्हाला माहितीच आहे...परंतू मी किती मोठी वेडी आहे हे तुम्हाला अजून माहितीच नाहीये...
3 / 5
कंगना राणावत हिने बॉलिवूड माफियांविरोधात आवाज उठवला आहे. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ज्यांना माझी काळजी होती त्या सर्वांना सांगत आहे की... काल रात्रीपासून माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या संशयास्पद घटना आता बंद झाल्या आहेत. आता कोणीही कॅमेरा घेऊन फाॅलो करत नाहीये....कारण ज्या भूतांना लाथाने समजते त्यांना लाथांनीच सांगावे लागते.
4 / 5
चंगु मंगू गॅंगसाठी एक संदेश आहे...बाळांनो...तुमचा कोणत्याही देहातीसोबत संबंध आला नाहीये...वेळेपूर्वीच स्वत:मध्ये सुधारणा करा...नाही तर… ज्यांना मी वेडी वाटते...त्यांना घरामध्ये घुसून मारील...
5 / 5
पुढे कंगना राणातव म्हणाली की, तुम्हाला माहितीये ना मी खूप वेडी आहे...परंतू तुम्हाला माहित असल्यापेक्षाही मी जास्त वेडी आहे...आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.