छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप सोडणारी मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवत आहे. मौनीचे चाहतेही तिच्या बॉलिवूड प्रवासामुळे खूप आनंदी आहेत.
मौनी त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतंच मौनीनं तिचे काही खास फोटो चाहत्यांसाठी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता मौनीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती देसी स्टाईलमध्ये दिसली. ती साडीमध्ये कहर करताना दिसतेय.
मौनीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवरून हे स्पष्ट होतंय की ती साडी स्टाईलमधीही चाहत्यांना घायाळ करू शकते.
मौनीनं अंगद बेदीसोबत 'बैत-बैठा' या गाण्याची झलक फोटोंद्वारे चाहत्यांना दिली आहे.