एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. पण आता रवीना टडंन नाही तर तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे. रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
राशा हिने आई रवीना हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा- रवीना यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री नसली तरी राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
राशा फक्त तिच्या लोकप्रियतेमुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान याच्यासोबत राशाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात.